हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड

मुकुंद पोतदार
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सध्याचा फॉर्म बघता रोहित हा उच्चांक करू शकतो आणि आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवू शकतो. या क्रमवारीत रोहितला आधी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील याला मागे टाकावे लागेल. गेल या मालिकेत खेळणार नसल्यामुळे रोहितला पुरेपूर संधी आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा याला युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल याचा एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक षटकारांचा उच्चांक रोहित प्रस्थापित करू शकतो. त्यासाठी त्याला चार षटकार खेचावे लागतील. शनिवारी फ्लोरीडामधील लॉडरहील येथे पहिली लढत होत आहे.

सध्याचा फॉर्म बघता रोहित हा उच्चांक करू शकतो आणि आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवू शकतो. या क्रमवारीत रोहितला आधी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील याला मागे टाकावे लागेल. गेल या मालिकेत खेळणार नसल्यामुळे रोहितला पुरेपूर संधी आहे.

कारकिर्दीत सर्वाधिक षटकार

संख्या फलंदाज देश सामने

105-ख्रिस गेल-वेस्ट इंडिज-58

103-मार्टिन गप्टील-न्यूझीलंड-76

102-रोहित शर्मा-भारत-94

92 कॉलीन मुन्रो-न्यूझीलंड-52

91-ब्रेंडन मॅक््लम-न्यूझीलंड-71

आणखी एका विक्रमाची संधी

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक चौकारांचा विक्रमही रोहित करू शकतो. त्याने 207 चौकार मारले आहेत. अफगाणिस्तानचा महंमद शहजाद (218), विराट कोहली व श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान (प्रत्येकी 223) त्याच्या पुढे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma can record of more sixes in Internationale T 20 worldcup