IND vs AUS : रोहितची कॅप्टन्स इनिंग; त्यावर DK चा फिनिशिंग टच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Captains Inning Dinesh Karthik Finishing Touch India Defeat Australia

IND vs AUS : रोहितची कॅप्टन्स इनिंग; त्यावर DK चा फिनिशिंग टच

IND vs AUS 2nd T20 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली. हार्दिक पांड्याने 9, राहुलने 10 आणि विराटने 11 धावा केल्या. झाम्पाने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 तर कर्णधार फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. (Rohit Sharma Captains Inning Dinesh Karthik Finishing Touch India Defeat Australia)

हेही वाचा: Jhulan Goswami : झुलन म्हणाली; निवृत्त होताना एकच शल्य कामय मनात राहील...

ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या भारताने हेजवलूडच्या पहिल्याच षटकात 20 धावा चोपल्या. सलामीवीर रोहित शर्माने दोन तर केएल राहुलने एक षटकार मारला. पॉवर प्लेचे दुसरे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सच्या षटकात राहुल आणि रोहितने 10 धावा करत पॉवर प्लेमध्ये 30 धावा वसूल करून घेतल्या.

मात्र त्यानंतर झॅम्पाने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 10 धावा करणाऱ्या केएल राहुलला बाद केले. यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने 3.5 षटकातच भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र झाम्पाने पाचव्या षटकात भारताला विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव असे पाठोपाठ दोन धक्के दिले. झॅम्पाने पाचव्या षटकात फक्त 7 धावा दिल्याने भारताच्या 3 बाद 58 धावा झाल्या.

आता भारताला विजयासाठी 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. रोहित शर्माने एबोट टाकत असलेल्या सहाव्या षटकात 11 धावा केल्या. त्यामुळे हे टार्गेट 11 चेंडूत 22 धावा असे आले. त्यानंतर सातवे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सच्या षटकात हार्दिक पांड्याने फटकेबाजी करण्याच्या नादात विकेट गमावली. त्याने 9 चेंडूत 9 धावा केल्या. अखेर रोहितने या षटकात शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना 6 चेंडूत 9 धावा असा आवाक्यात आणला.

हेही वाचा: IPL 2023 Auction :डिसेंबरमध्ये ठरणार जडेजा CSK की GT चा; BCCI लिलावाचं करतंय प्लॅनिंग?

तत्पूर्वी, भारताचे स्लॉग ओव्हरमधील दुखणे जसप्रीत बुमराह संघात परतला तरी कायम राहिले आहे. दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या बुमराहने चांगला मारा केला. मात्र यावेळी शेवटचे षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलने 19 धावांची खैरात वाटली. मॅथ्यू वेडने त्याच्या शेवटच्या षटकात 19 धावा चोपल्या. वेडने 20 चेंडून नाबाद 43 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला 8 षटकात 5 बाद 90 धावांपर्यंत पोहचवले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रत्येकी 8 षटकांचा खेळ झाला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीने गेल्या सामन्यातील हिरो कॅमेरून ग्रीनला 5 धावांवर धावबाद केले.

त्यानंतर अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेल (0) आणि टीम डेव्हिड (2) यांचा त्रिफळा उडवत कांगारूंची अवस्था 3.1 षटकात 3 बाद 31 धावा अशी केली. दरम्यान अॅरोन फिंचने 14 चेंडूत 31 धावा करून एक बाजू लावून धरली होती. मात्र दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराहने त्याचा यॉर्करवर त्रिफळा उडवत त्याची खेळी संपवली.

दरम्यान, मॅथ्यू वेडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 6 षटकात 59 धावांपर्यंत पोहचवले. मात्र बुमराहने सातव्या षटकात 12 धावा दिल्या. त्यानंतर मॅथ्यू वेडने हर्षल पटेल टाकत असलेल्या 8 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरही वेडने षटकार मारत नव्वदी पार केली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर वेडला एकही धाव करता आली नाही. अखेर वेडने 19 चेंडूत 43 धावा करून ऑस्ट्रेलियाला 8 षटकात 5 बाद 90 धावा करून दिल्या.

Web Title: Rohit Sharma Captains Inning Dinesh Karthik Finishing Touch India Defeat Australia In 2nd T20

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..