Video : "अय्, आवाज येत नाही काय?"; रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Video : "अय्, आवाज येत नाही काय?"; रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळा

Rohit Sharma Dinesh Karthik : ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा धरला.

हेही वाचा: Bhuvneshwar Kumar : स्लॉग ओव्हरमधला बिनकामाचा भुवनेश्वर; 'या' 5 कारणांमुळे भारत हरला!

अक्षर पटेलने कर्णधार अॅरॉन फिंचला लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवले. स्मिथ एलबीडब्ल्यू बाद झाला. पण दिनेश कार्तिकने कोणीही अपील केले नाही. त्यानंतर उमेश यादवच्या षटकात दोन्ही वेळा एज बाद करण्याचे अपील केले नाही. एकापाठोपाठ एक तीन चुका केल्यानंतर रोहितने कार्तिकवर चिडून त्याची गळा पकडली.

हेही वाचा: IND vs AUS : भारताची सुरूवात अन् शेवटही खराब; कांगरूंनी घेतली आघाडी

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. संघाने तीन झेल सोडले. या पराभवात क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीही खराब होती. अक्षर पटेल वगळता सर्वांनी भरपूर धावा दिल्या.

अष्टपैलू हार्दिक पांड्या (नाबाद 71) आणि सलामीवीर केएल राहुल (55 धावा) यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव (46 धावा) करत भारताने 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाने ग्रीनचे अर्धशतक, स्टीव्ह स्मिथच्या 35 आणि वेडच्या 21 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 45 धावांच्या जोरावर 19.2 षटकांत सहा बाद 211 धावा करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाच्या सामन्यात टीम डेव्हिडने 18 धावा केल्या.

Web Title: Rohit Sharma Gives A Hilarious Death Stare To Dinesh Karthik During 1st T20i Vs Australia Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..