Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माने स्वतः दुखापतीबद्दल दिले अपडेट, म्हणाला...

दुखापतीनंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आला की, रोहित मालिकेत पुढे खेळू शकेल की नाही...
 Ind vs Wi Rohit Sharma
Ind vs Wi Rohit Sharma sakal
Updated on

Ind vs Wi Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करताना दुखत झाली. रोहित 5 चेंडूत 11 धावा करत खेळत होता, ज्यात एक षटकार आणि एक चौकार होता. यानंतर त्याच्या कमरेच्या स्नायूमध्ये ताण आला, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आला की, रोहित मालिकेत पुढे खेळू शकेल की नाही. या प्रश्नाचे उत्तर खुद्द कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर दिले आहे.

 Ind vs Wi Rohit Sharma
सुर्यकुमार यादवने तुफानी खेळी खेळत जिवलग मित्राचे संपवले करिअर!

रोहितने अल्झारी जोसेफला एक षटकार आणि एक चौकार मारून एक धाव घेतली. अचानक हिटमॅन' शर्माच्या पाठीच्या स्नायूमध्ये ताण आला. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश यांनी मैदानात जाऊन उपचार केले. त्यानंतर काही मिनिटातच रोहित दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. 'हिटमॅन' शर्माच्या पाठीच्या स्नायूमध्ये ताण आल्याचे सांगण्यात येत आहे. तो पुढील दोन सामने खेळू शकणार नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. पुढील दोन सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहेत.

 Ind vs Wi Rohit Sharma
Rohit Sharma : live मॅचमध्ये टीम इंडियाला मोठा झटका! रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर

रोहित शर्माने या शानदार विजयानंतर आपल्या दुखापतीबाबतही मोठा अपडेट दिला. तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणावर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'मी ठीक आहे' पुढच्या सामन्यात वेळ मिळाला तर तोपर्यंत मी पूर्णपणे तंदुरुस्त होईल याची मला खात्री आहे. आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि खेळपट्टीचा चांगला वापर केला.

पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सलामीवीर काईल मेयर्सच्या 73 धावांच्या जोरावर 20 षटकात 5 गडी गमावून 164 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 19 षटकांत विजयाची नोंद केली. टीम इंडियासाठी या सामन्यात सूर्यकुमारने सर्वाधिक 76 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com