Rohit Sharma : रोहितनं 215 Kmph वेगाने गाडी चालवलीच नाही; काय म्हणतात महामार्ग पोलीस

Rohit Sharma Over Speeding Fine
Rohit Sharma Over Speeding Fineesakal

Rohit Sharma Over Speeding Fine : भारताचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरूद्ध 40 चेंडूत 48 धावांची आक्रमक खेळी केली. भारताने बांगलादेशचा सात विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपमधील सलग चौथ्या विजयासह आपली घोडदौड सुसाट पुढं नेली.

दरम्यान, सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार वेगामुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडला. रोहित शर्मा अहमदाबादमधील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर थेट मुंबईत घरी गेला होता. यानंतर रोहिने पुण्यातील बांगलादेशविरूद्धचा सामना खेळण्यासाठी आपल्या आलिशान लॅम्बॉर्गिनी उरूने प्रवास केला.

Rohit Sharma Over Speeding Fine
David Warner : हा ऑस्ट्रेलियन 'पुष्पा' पाकला पाहून खवळतो! 14 चौकार 9 षटकार, 23 चेंडूत 110 धावा

मात्र यावेळी त्याने दोनवेळा वेगमर्यादेचे नियम तोडले असल्याचे समोर आले. त्याने 215 किलोमीटर प्रतीतास वेगाने गाडी चालवल्याची वृत्त आले होते. मात्र आता महामार्ग पोलीसांनी खरी माहिती दिली आहे.

महामार्ग पोलीस अधीक्षक लता फड यांनी स्पष्ट केलं की, 'वेगमर्यादा ओलांडून गाडी चालवल्याप्रकरणी रोहित शर्मावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानेही आपली चूक मान्य करत त्वरित दंड भरला आहे.'

Rohit Sharma Over Speeding Fine
Haris Rauf : भारत परवडला ऑस्ट्रेलिया नको रे बाबा! राऊफचा रूबाब 4 षटकातच उतरला

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वेग मर्यादा ही 105 किलोमीटर प्रतीसात इतकी आहे. रोहितने कामशेत भोगद्याजवळ 117 किमी प्रतीतास वेगाने गाडी चालवली. तर सोमाटेन फाटा येथील स्पीडगनमध्ये रोहितच्या लॅम्बॉर्गिनी उरूचा वेग हा 111 किमी प्रतीतास दाखवला.

रोहित शर्माने दोनवेळा ओव्हर स्पीडिंग केल्याने त्याला 4000 रूपयांचा दंड ठोठवण्यात आला. त्याला दोन - दोन हजारांचे दोन चलन भरावे लागले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com