रोहित - जडेजाची दुखापत किती गंभीर?

रोहित - जडेजा रिहॅबिटेशनसाठी एनसीएमध्ये दाखल; दुखापत किती गंभीर?
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal

बंगळुरु : भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दोघेही आपल्या दुखापतीतून लवकर सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दाखल झाले आहेत. या दोघांनाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) जाता आले नव्हते. या दोघांचे एनसीएमधील फोटो भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार यश धूल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले होते.

Rohit Sharma
आधी न्यूझीलंड आता विंडीजनेही पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडला

भारताचा 19 वर्षाखालील संघ आशिया कप (Asia Cup) खेळण्यासाठी 23 डिसेंबरला युएईला रवाना होणार आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) काही दिवसांपूर्वीच भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद (ODI Captaincy) सोपवले आहे. याचबरोबर त्याला कोसटी संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. मात्र दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कोसटी मालिकेला मुकला. रोहित शर्माला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागण्याची शक्यता आहे. तर रविंद्र जडेजाची दुखापत थोडी गंभीर असून त्याला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma
Ashes : स्टीव्ह स्मिथची कॅप्टन्स इनिंग; शतक मात्र हुकले

रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) यांची निवड करण्यात आली. तो कसोटीत रोहित शर्माची जागा घेईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com