Rohit Viral Reaction Chahar 6 | Video: दीपक चहरचा 'जंबो' षटकार; रोहित शर्मानेही ठोकला सलाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-Deepak-Chahar

चहरने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला जागेवरून मारला सिक्सर

Video: दीपक चहरचा 'जंबो' षटकार; रोहित शर्मानेही ठोकला सलाम

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, 3rd T20: भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडला ३-०ने पराभूत केले. रविवारी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. कर्णधार रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने चांगली सुरूवात केली. पण मधल्या फळीतील लोकांनी मात्र निराशा केली. एके वेळी २०० पार जाणारी धावसंख्या १५०चा आकडा तरी गाठेल का अशी शंका निर्माण झाली. त्यावेळी आधी हर्षल पटेलने थोडी फटकेबाजी केली तर अखेरच्या षटकात दीपक चहरने तुफानी खेळी केली. दीपक चहरने वेगवान गोलंदाजाला उत्तुंग असा षटकार लगावला. त्याचा षटकार पाहून चक्क रोहित शर्मानेही सलाम ठोकला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रोहितने ५६ धावांची खेळी केली. मधल्या फळीने निराशा केल्यावर हर्षल पटेलने ११ चेंडूत १८ आणि दीपक चहरने ८ चेंडूत नाबाद २१ धावा करत संघाला १८४ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करणं न्यूझीलंडला झेपलं नाही. मार्टीन गप्टीलने ५१ धावांची खेळी केली, पण इतर कोणीही फलंदाजीत चमक दाखवू शकलं नाही. त्यामुळे त्यांचा डाव १११ धावांवर आटोपला.

loading image
go to top