INDvsSA : रोहित तब्बल दोन चेंडू खेळला अन् शून्यावर माघारी गेला

वृत्तसंस्था
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन दिवसांच्या सराव कसोटी सामन्यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बऱ्याच दिवसांनंतर रोहित शर्मा कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून पुनरागमन करणार होता. मात्र, त्याचे हे पुनरागमन अत्यंत खराब झाले आहे. सराव सामन्यात तो केवळ दोन चेंडूचा सामना करुन भोपळाही न फोडता बाद झाला. 

विझीनांग्राम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन दिवसांच्या सराव कसोटी सामन्यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बऱ्याच दिवसांनंतर रोहित शर्मा कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून पुनरागमन करणार होता. मात्र, त्याचे हे पुनरागमन अत्यंत खराब झाले आहे. सराव सामन्यात तो केवळ दोन चेंडूचा सामना करुन भोपळाही न फोडता बाद झाला. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित आणि मयांक अगरवाल सलामीला उतरले. सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करण्याचे रोहित खूप दडपण असणार यात काहीच शंका नव्हती आणि झालेही तेच. तो केवळ दोन चेंडू खेळला आणि शून्यावर बाद झाला. फिलेंडरने त्याला बाद केले. 

तीन दिवसांच्या या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला . त्यानंतर दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेने सहा बाद 279 धावा करत डाव घोषित केला. 

मालिकेचे वेळापत्रक 
पहिला सामना : 2 ते 6 ऑक्टोबर : विशाखापट्टणम
दुसरा सामना : 10 ते 14 ऑक्टोबर : पुणे
तिसरा सामना : 19 ते 23 ऑक्टोबर : रांची

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scored only 2 runs in warm up match against South Africa