INDvsSA : रोहित खऱ्या अर्थाने हीट; झळकाविले शानदार शतक

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक शैलीच्या खेळीची त्याच्याकडून सारेच अपेभा करत होते. त्यानेही नेहमीप्रमाणे मैदानात पाऊल ठेवले आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. याचसह त्याने कसोटी कारर्किदीतील चौथे शतक साजरे केले. 

विशाखापट्टणम :  भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. 

INDvsSA : रोहितची दणक्यात एन्ट्री; मोडला विराट, पुजाराचा विक्रम 

वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक शैलीच्या खेळीची त्याच्याकडून सारेच अपेभा करत होते. त्यानेही नेहमीप्रमाणे मैदानात पाऊल ठेवले आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. याचसह त्याने कसोटी कारर्किदीतील चौथे शतक साजरे केले. 

रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले. 

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये भारतातील मैदानांवर दहा डावांमध्ये सर्वाधिक सरासरी असलेले खेळाडू :
रोहित शर्मा- 91.22*
विजय हजारे- 69.56
विराट कोहली- 64.68
चेतेश्वर पुजारा- 61.86
महंमद अझरुद्दीन- 55.93
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scores 1st century as an opener in Test Cricket