INDvsSA : रोहितला वेड लागलंय; सलग दुसरं शतक ठोकलंय

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सलामीवीर म्हणून सगळे विक्रम मोडण्यास तयार झाला आहे. दुसऱ्या डावातही त्याने तुफान फलंदाजी करत सलग दुसरे शतक केले. 

विशाखापट्टणम : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सलामीवीर म्हणून सगळे विक्रम मोडण्यास तयार झाला आहे. दुसऱ्या डावातही त्याने तुफान फलंदाजी करत सलग दुसरे शतक केले. 

INDvsSA : अन् चिडलेला रोहित म्हणाला, ''पुज्जू भाग बे****''

दुसऱ्या डावाला सुरवात झाल्यापासूनच रोहितने फटकेबाजी करण्यास सुरवात केली. त्याने पुजारालाही फटकेबाजी करण्यास प्रवृत्त केले.

रोहितने 133 चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील पाचवे तर सलामीवीर म्हणून दुसरे शतक झळकाविले. त्याच्या या खेळीत आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scores 5th test century in 1st test against south africa