Rohit Sharma VIDEO : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच बाप! आफ्रिदी सोडाच बॉस गेललाही टाकलं मागं

Rohit Sharma
Rohit Sharma esakal

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्याने 30 चेंडूत अर्धशतक ठोकत 12 व्या षटकात भारताला शतक पार करून दिले. दरम्यान, आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस गेलचं 553 षटकारांचे रेकॉर्ड मोडले.

अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीच्या पाटा खेळपट्टीवर रोहित शर्माने भारताला आक्रमक सुरूवात केली. त्याचा पार्टनर इशान किशन सेट होण्याचा प्रयत्न करत असतानाच रोहितने दुसऱ्या बाजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने आपला आंंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 554 वा षटकार मारला. या षटकारासोबतच रोहित शर्माने ख्रिस गेलचे सर्वाधिक (553) आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम मोडला.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार

  • 554 - रोहित शर्मा

  • 553 - ख्रिस गेल

  • 476 - शाहिद आफ्रिदी

  • 398 - ब्रॅडन मॅक्युलम

  • 383 - मार्टिन गप्टिल

याचबरोबर रोहित शर्माने आजच्या सामन्यात अजून एक माईल स्टोन गाठला. त्याने वर्ल्डकपमधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. तो भारताकडून वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे 2011 च्या वर्ल्डकपमध्ये त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्याने 2015, 2019 आणि 2023 असे तीन वर्ल्डकप खेळत ही कामगिरी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com