

Harshal Ghuge wins Dubai Roll Ball World Cup
ESakal
अहिल्यानगर : क्रीडा क्षेत्रातील भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, भारतीय पुरुष संघाने ७ व्या रोल बॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दुबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचा सुपुत्र आणि मुंबई प्राप्तिकर विभागातील साहाय्यक हर्षल सोमनाथ घुगे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात हर्षलने केलेल्या तीन महत्त्वपूर्ण गोल्सच्या जोरावर भारताने केनियाचा ११-१० अशा फरकाने निसटता पराभव केला.