Ross Taylor Racism : भारतीय समजून सहकारीच कारायचे शिवीगाळ

Ross Taylor Reveal Faced Racism In New Zealand Cricket Team In Autobiography Ross Taylor Black & White
Ross Taylor Reveal Faced Racism In New Zealand Cricket Team In Autobiography Ross Taylor Black & WhiteESAKAL

Ross Taylor Racism : न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलरने काही महिन्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. या आत्मचरित्रात त्याने न्यूझीलंड संघात आपल्याला वंशभेदाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला. न्यूझीलंड सारख्या सहसा वादात न सापडणाऱ्या संघात वर्णद्वेश होत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. (Ross Taylor Reveal Faced Racism In New Zealand Cricket Team In Autobiography Ross Taylor Black & White)

Ross Taylor Reveal Faced Racism In New Zealand Cricket Team In Autobiography Ross Taylor Black & White
Asia Cup 2022 : आशिया कपसाठी रोहित, विराटसह सर्वांची होणार फिटनेस टेस्ट

रॉस टेलरचे 'रॉस टेलर ब्लॅक अँड व्हाईट' हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यात रॉस टेलर म्हणतो की, 'न्यूझीलंडमध्ये क्रिकेट हा एक चांगला खेळ म्हणून ओळखला जातो. मी माझ्या कारकिर्दित एक वेगळा खेळाडू म्हणून राहिलो आहे. लोक म्हणतील की हा एक फक्त विनोद होता. याने कोणाचेही कोणतेही नुकसान झालेले नाही. मग आता तुम्ही या गोष्टीला का हवा देत आहात? यापेक्षा तुम्ही गेंड्याच्या कातडीचे व्हा. जे होत आहे ते होऊ द्या. मात्र असं करणं योग्य आहे का?'

न्यूझीलंडच्या एका वृत्तपत्रात टेलरच्या आत्मचरित्रामधील एक भाग प्रकाशित झाला होता. यात टेलर लिहितो, 'खेळात पॉलीनेशियन समुदायाचे प्रतिनिधित्व कमी आहे. कधी कधी लोक मी माओरी किंवा भारतीय असल्याचे मानतात. संघातील एक सहकारी एकदा मला म्हणाला की रॉस तू अर्धा चांगला माणूस आहेस मात्र कोणता अर्धा चांगला आहेस हे तुला माहिती नाही. हा खेळाडू नेमकं काय म्हणतोय हे मला समजत होतं. संघातील काही खेळाडूंना देखील वंशभेदी टिप्पणींचा सामना करावा लागला होता.'

Ross Taylor Reveal Faced Racism In New Zealand Cricket Team In Autobiography Ross Taylor Black & White
'छोटू भय्या बॅट - बॉलने खेळ, मी काही मुन्नी नाही जी बदनाम होईल'

रॉस टेलरने सांगितले की, न्यूझीलंडमध्ये श्वेतवर्णीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. याबाबत टेलर म्हणतो की, 'अनेकवेळा मी खराब फटका मारला की माझ्याविरूद्ध अत्यंत खराब शब्दांचा वापर केला जायचा. मात्र असा फटका संघातील इतर खेळाडूंनी खेळला तर त्यावेळी अशा शब्दांचा वापर केला जात नव्हता. इतर खेळाडूंसाठी ते फक्त 'खराब फटक्याची निवड' असे असायचे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com