RSA vs IND: भारताचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपला, आफ्रिकेलाही १ धक्का

RSA vs IND 3rd Test day 1
RSA vs IND 3rd Test day 1esakal

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिला डाव २२३ धावात गुंडाळला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ७९ धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून कसिगो रबाडाने भेदक मारा करत भारताचे चार फलंदाज टिपले. त्याला मार्को जेनसेनने ३ विकेट घेत चांगली साथ दिली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी चांगली भागीदारी करणार असे वाटत असतानाच राहुल १२ तर मयांक अग्रवाल १५ धावा करुन पाठोपाठच्या षटकात बाद झाले.

त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला. ही जोडी भारताला शतकापर्यंत पोहचवणार तोच जेनसेनने पुजाराला ४३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रहाणेही ९ धावांची भर घालून माघारी फिरला. दरम्यान, सेट झालेल्या विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारताचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. मात्र भारताने १५० टप्पा पार केल्यानंतर पंतने विराटची साथ सोडली.

पंत बाद झाल्यानंतर विराट कोहीलने एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनला २ धावांचे योगदान देता आले. त्यानंतर ठाकूरने १२ धावा करुन काही अंशी साथ दिली. विराट ठाकूरला बरोबर घेत आपले दीर्घ काळ प्रलंबित असलेले शतक पूर्ण करणार अशी आशा निर्माण झाली. मात्र शार्दुल ठाकूर बाद झाला आणि विराट कोहलीची शतकाची आशाही मावळली.

विराट कोहली ७९ धावांवर बाहेरचा चेंडू चेस करण्याच्या नादात बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने जास्त वेळ न लावता भारताचा डाव २२३ धावत संपुष्टात आणला. भारताचा पहिला डाव २२३ धावांत संपुष्टात आणल्यानंतर दिवसाचा उरलेली काही षटके खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानावर आला. मात्र बुमराहने डीन एल्गरला ३ धावांवर बाद करत आफ्रिकेला दिवस संपता संपता एक धक्का दिलाच.

  • पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेच्या १ बाद १७ धावा

  • पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता दक्षिण आफ्रिकेला बुमराहने दिला मोठा धक्का, कर्णधार डीन एल्गर ३ धावा करुन बाद

  • भारताचा पहिला डाव २२३ धावात संपुष्टात

  • 211 - 9 विराट कोहलीची शतकाची प्रतिक्षा पुन्हा लांबली, ७९ धावांवर बाहेरचा चेंडू छेडण्याच्या नादात झाला बाद

  • 210 - 8 विराटचे शतक अडचणीत, बुमराह आल्या पावली परतला

205 - ७ शार्दुल ठाकूर १२ धावांची भर घालून परतला

  • 175-6 : आर अश्विन २ धावांची भर घालून माघारी, शार्दुल ठाकूर विराटची साथ देण्यासाठी मैदानावर

  • 167-5 : पंतने सोडली विराट साथ, २७ धावा करुन जेनसेची बनला शिकार

59.5 : निर्णायक कसोटीत कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक

  • 116-4 : अजिंक्य रहाणेकडून पुन्हा निराशा, ९ धावांची भर घालून परतला. रहाणेसाठी संघातील तिसरी कसोटी संघातील स्थान मिळवण्यासाठी महत्वाची आहे. त्यातील पहिल्या डावत ९ धावा करुन रहाणेने एक डाव वाया घालवला असून आता दुसऱ्या डावात तो कशी फलंदाजी करतो याच्यावर त्याचे संघातील भविष्य अवलंबून असणार आहे.

  • 95-3 : अर्धशतकाच्या तोंडावरच पुजाराची घरवापसी, सेट होऊन बाद होण्याची परंपरा कायम

  • IND 81-2 : पुजारा, विराटने डाव सावरला. भारताची शतकाकडे कूच

  • 33-2 : राहुल पाठोपाठ मयांकही माघारी, भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये

  • भारतीय संघात दोन बदल, विहारीच्या जागी विराट आणि सिराजच्या जागी उमेश यावद खेळणार

  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com