RSA vs IND : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारण...

RSA vs IND
RSA vs INDSakal
Summary

आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजय मिळवणं सहज सोपं नाही असे संकेत आफ्रिकेनं टीम इंडियाला दिले आहेत.

RSA vs IND, Five Reason Behind Team India Loss 2nd Test : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात धमाकेदार केली. सेंच्युरियनच्या मैदानातील पहिला कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली. जोहन्सबर्गच्या मैदानातील सामना जिंकून आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडिया करुन दाखवेलं असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना होता. पण चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या विरुद्ध लागला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 गडी राखून मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजय मिळवणं सहज सोपं नाही असे संकेत आफ्रिकेनं टीम इंडियाला दिले आहेत. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण.....(RSA vs IND 5 reason behind Team India Loss Against South Africa at Johannesburg Wanderers Stadium test)

विराट कोहलीची अनुपस्थिती आणि सलामी जोडीची खराब कामगिरी

जोहन्सबर्गच्या मैदानात लोकेश राहुल (KL Rahul) टॉससाठी मैदानात उतरला आणि भारतीय संघाला (Team India) मोठा धक्काच बसला. सामना सुरु होण्यापूर्वीच विराट कोहली (Virat Kohli) आउट झाला. दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आणि टीम इंडियाचे टेन्शन वाढले. पहिल्या डावात लोकेश राहुलनं अर्धशतक केल. पण दुसऱ्या बाजूला मंयक अग्रवाल (Mayank Agarwal) अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात 26 आणि दुसऱ्या डावात 23 धावा केल्या. त्याची ही कामगिरी भारतीय संघाला बॅकफूटवर नेणारी होती.

पहिल्या डावातील पुजारा-अजिंक्यचा फ्लॉप शो

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या जोडीनं भलेही दुसऱ्या डावात शतकी भागीदारी केलेली असोत. पण पहिल्या डावातील त्यांचा फ्लॉप शो टीम इंडियाला अडचणीत आणणारा होता. अजिंक्य रहाणेला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे पुजाराने 3 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवले. पण पहिल्या डावातील फ्लॉप शोमुळे दक्षिण आफ्रिकेला अल्प का होईन आघाडी मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास उंचवण्यास ही गोष्ट पुरेसी ठरली.

पंतची कामगिरी ही असमाधानकारक

भारतीय संघाचा धडाडीचा फलंदाज आणि ज्याच्यामध्ये मॅच विनिंग खेळी करण्याची क्षमता आहे, तो रिषभ पंत (Rishabh Pant) दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात त्याने 17 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने दुसऱ्या डावात मैदानात काहीकाळ थांबला असता तर भारतीय संघाला निश्चितच फायदा झाला असता. त्याची ढिसाळ फलंदाजी टीम इंडियाच्या पराभवामागचं एक कारणच आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या चार गोलंदाजांची कमाल

दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजासोबत गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. जलदगतीसाठी नंदवन असणाऱ्या खेळपट्टीवर रबाडा (Rabada),मार्को (Marco Jansen) आणि एनिग्डी (Lungi Ngidi) यांची जमलेली जोडी भारतीय फलंदाजांसाठी चांगलीच घातक ठरली. पहिल्या डावात रबाडा आणि मार्को यांनी अनुक्रमे तीन-चार विकेट घेतल्या. यावेळी त्यांना ओलिव्हरनं (Olivier) तीन विकेट घेऊन साथ दिली. दुसऱ्या डावात रबाडा-मोर्को यांनी पुन्हा तीन-तीन विकेट घेतल्या. यावेळी त्यांनी एनिग्डीची साथ लाभली. चौघांच्या गोलंदाजीनं भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले.

दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी केलेली भागीदारी

पहिल्या डावातच दक्षिण आफ्रिकेनं अल्प पण महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. पहिल्या डावात मार्करम स्वस्तात परतल्यानंतर एल्गर आणि पीटरेनमध्ये 74 धावांची भागीदारी झाली. टेम्बा बवुमाच्या साथीनं 60 धावा केल्या. त्यांची हीच रणनिती दुसऱ्या डावातही दिसली. धावांचा पाठलाग करताना दबावात खेळतानाही त्यांनी छोटीखानी भागीदारी केली. दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात अपयश आले. पहिल्या डावात शार्दुल ठाकूरनं एकट्यानं सात विकेट घेतल्या. बुमराह, शमी यांच्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसारखा ताळमेळ बसला नाही. त्यात भर पडली ती सिराजची दुखापत. त्याच्या दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजीतील ताकद कमी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com