'संथ वाहते खेळी', विराटचा पुजारा झालायं | Virat Kohli slowest batting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Slowest Batting
'संथ वाहते खेळी', विराटचा पुजारा झालायं

'संथ वाहते खेळी', विराटचा पुजारा झालायं

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचे पहिले सत्र भारताच्या दृष्टीने महत्वाचे होते. दुसऱ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद होते. त्यामुळे ते भारताचा डाव २ बाद ५७ पासून पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा होती. मात्र चेतेश्वर पुजारा तिसऱ्या दिवशी एकही धावेचे योगदान न देता माघारी परतला. त्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) आपले खाते उघडून माघारी परतला. (Virat Kohli Slowest Batting)

हेही वाचा: न्यूज अँकरची जोकोविचला 'ऑन कॅमेरा' शिवीगाळ

त्यामुळे २ बाद ५७ वरुन भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली. या परिस्थितीत भारताचा कर्णधार विराट कोहलीवर (Captain Virat Kohli) डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडली. त्याने भारताचा डाव सावरला देखील. मात्र या डावात विराट टच नव्हता. तो इतका संथ फलंदाजी करत आहे की स्कोअर बोर्डवर नजर टाकली तर विराट फलंदाजी करतोय की चेतेश्वर पुजारा फलंदाजी करतोय हे कळणार नाही. पहिल्या डावातही विराट कोहलीने आपला कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ अर्धशतकापैकी एक अर्धशतक ठोकले होते. (Virat Kohli Slowest Half Century)

हेही वाचा: RSA vs IND Live: पंतने भारताला सावरले

विराट कोहलीने (Virat Kohli) उपहारापर्यंत तब्बल १२७ चेंडू खेळत फक्त २८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूने गेल्या काही दिवसांपासून आपल्या बेदरकार फटकेबाजीमुळे टीकेचा धनी ठरलेल्या ऋषभ पंतने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले. त्याने उपहारापर्यंत ६० चेंडूत ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या या महत्वपूर्ण भागिदारीमुळे भारताने आतापर्यंत १४३ धावांची आघाडी घेतली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top