RSA vs IND Day 3 : सामना रंगतदार स्थितीत; दिवसाअखेर आफ्रिका 2 बाद 118 धावा |Cheteshwar Purara Ajinkya Rahane Batting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

South Africa vs India 2nd Test Live Updates
RSA vs IND: पुजारा अर्धशतकाच्या जवळ

RSA vs IND Day 3 : सामना रंगतदार स्थितीत; दिवसाअखेर आफ्रिका 2 बाद 118 धावा

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 266 धावा करुन यजमान आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या आहेत. रस्सी व्हॅन डेर दुसेन (Rassie van der Dussen) 11 (37) आणि कर्णधार डेन एल्गर Dean Elgar 46 (121) धावांवर नाबाद खेळत होते. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने मार्करमच्या रुपात Aiden Markram एक विकेट घेतली. तर अश्विनने Keegan Petersen ला तंबूचा रस्ता दाखवला. सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला अजून आठ विकेट्स मिळवायच्या आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला 122 धावा करायच्या आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (RSAvsIND 2nd Test day 3) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारत आपला दुसरा डाव 2 बाद 85 धावांपासून पुढे सुरु केला. या कसोटीत (Test Cricket) भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) भेदक माऱ्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांत गुंडाळला. शार्दुल ठाकूरने 61 धावात 7 बळी टिपले.

दक्षिण आफ्रिकेकडे (South Africa) जरी 27 धावांची आघाडी असली तरी भारताने दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 85 धावा केल्या. त्यामुळे भारताकडे 58 धावांची आघाडी होती. आज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 धावांपासून तर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 11 धावांपासून खेळ पुढे नेला. दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर अजिंक्य पाठोपाठ पुजाराही माघारी फिरला. हनुमा विहारीने नाबाद 40 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात 266 धावांपर्यंत मजल मारता आली.

 • 93-2 : अश्विनच्या फिरकीत जादू दिसली; आफ्रिकेला दुसरा धक्का, पीटरसेन 28 धावा करुन तंबूत

 • 47-1 : शार्दुलनं सलामी जोडी फोडली, मार्करम 38 चेंडूत 31 धावा करुन तंबूत

 • मार्करम-एल्गर जोडीनं केली दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात

टीम इंडियाकडून पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकानंतर हनुमा विहारीनं नाबाद 40 धावांची खेळी केली. शार्दुल ठाकूरनंही 28 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारतीय संघाने दुसऱ्या डावात केल्या 266 धावा, आफ्रिकेसमोर 240 धावांच लक्ष्य

 • 266-10 : एनिग्डीनं सिराजला बाद करत भारताचा दुसरा डाव आटोपला.

 • 245-9 : एनिग्डीनं घेतली बुमराहची विकेट, त्याने एका षटकाराच्या मदतीने केल्या 7 धावा

 • 228-8 : मोहम्मद शमीला खातेही उघडता आले नाही, जेनसनला मिळाले यश

 • 225-7 : जेनसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात शार्दुलच्या खेळी थांबली, त्याने 24 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केल्या 28 धावा

 • 46.3 : भारत २०० पार, शार्दुल ठाकूरचा दांडपट्टा सुरु

 • लंचपर्यंत भारताची ६ बाद १८८ धावांपर्यंत मजल, भारताकडे १६१ धावांची आघाडी

 • 184-6 : अश्विनही १६ धावांचे योगदान देऊन परतला.

 • 167-5 : रबाडाचा भेदक मारा, पंत भोपळाही न फोडता पॅव्हेलियनच्या वाटेवर

 • 163-4 : पुजाराने रहाणेचाच कित्ता गिरवला, भारताला चौथा धक्का

 • 155-3 : अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयश, रबाडाने ५८ धावांवर केले बाद

 • 32.4 : भारताकडे १२१ धावांची आघाडी

 • 31.2 : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची शतकी भागीदारी; दोघांचीही अर्धशतके पूर्ण

 • 22.4 : भारताची शतकी मजल, पुजारा अर्धशतकाच्या जवळ

 • भारताने तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद ८५ धावांपासून केला सुरु

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top