सात्विक-चिराग जोडीला उपविजेतेपद ; भारतीय जोडीला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवता आली नाही.

भारतीय जोडीने मागील वर्षी सहा स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली होती. या वर्षी मलेशिया ओपन या स्पर्धेतही त्यांनी लक्षणीय कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली.
games
gamessakal
Updated on

क्वालालम्पूर : सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारतीय जोडीला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवता आली नाही. लियांग केंग - वँग चँग या चीनच्या जोडीने सात्विक - चिराग जोडीचा संघर्ष तीन गेममध्ये (९-२१, २१-१८, २१-१७) परतवून लावला व अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली.

भारतीय जोडीने मागील वर्षी सहा स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली होती. या वर्षी मलेशिया ओपन या स्पर्धेतही त्यांनी लक्षणीय कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली. त्यामुळे या स्पर्धेचे जेतेपद त्यांच्या आवाक्यात आहे, असे चित्र निर्माण झाले.

अंतिम फेरीच्या लढतीत सात्विक - चिराग जोडीने पहिला गेम २१-९ असा जिंकत अप्रतिम सुरुवात केली; पण पुढील दोन गेममध्ये प्रतिस्पर्ध्यांकडून दबाव टाकण्यात आला. भारतीय जोडीकडून चुका होऊ लागल्या. यामुळे केंग - चँग जोडीला पुढील दोन गेम अनुक्रमे २१-१८, २१-१७ अशा फरकाने जिंकता आले. सात्विक रंकीरेड्डी म्हणाला, या स्पर्धेत आमच्याकडून झालेल्या खेळाने समाधान मिळाले आहे; पण अंतिम फेरीत दबावाखाली धैर्याने मुकाबला करता आला नाही. अखेरच्या क्षणांमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आम्ही दबावाखाली खेळलो. चुकाही केल्या. पुढच्या स्पर्धेत आम्ही या पराभवाचा वचपा काढू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com