

Shivneri Kabaddi Tournament
Sakal
दिवसातील सर्वोत्तम पकडींचा नजराना पेश करणाऱ्या रुपाली ज्वेलर्सच्या खेळाडूंनी शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात व्यावसायिक गटात रिजनल बोर्डाचा खेळ पहिल्या फेरीतच संपवला. रूपाली ज्वेलर्ससह मुंबई पोलिसांनीही व्यावसायिक गटात दणकेबाज विजयाची नोंद केली.
महिला गटात मुंबई पोलीस महिला संघ आणि विवेक महिला संघाने, तर कुमार गटात अंकुर क्रीडा मंडळ व यश क्रीडा मंडळाने विजय मिळवला. व्यावसायिक गटात बीएमसी संघाने न्यू इंडिया इन्शुरन्स संघावर मात केली.