Ruturaj Gaikwad:ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad: ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स

विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्ध इतिहास रचला. ऋतुराजने 159 चेंडूत 220* धावांची नाबाद खेळी खेळली ज्यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. एवढेच नाही तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात 7 षटकार ठोकले. (Ruturaj Gaikwad Becomes First Player to Hit 7 Sixes in an Over in White ball Cricket )

विजय हजारे करंडकाच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण 49 व्या ओव्हरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला. 49 वी ओव्हर घेऊन आलेल्या यूपीचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगला चांगलेच धुतले.

त्यानं प्रत्येक चेंडूवर सिक्सरची नोंद केली. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगनं नो टाकला. त्यावरही ऋतुराजनं सिक्सर लगावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह 43 धावा वसूल केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला.

या विक्रमी कामगिरीसह ऋतुराजने या इनिंगमध्ये द्विशतकही साजरं केलं. त्यानं 159 बॉल्समध्ये 10 फोर आणि तब्बल 16 सिक्सर्ससह 220 धावा ठोकल्या.

ऋतुराजआधी जेम्स फुलरच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ज्याने एका ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या होत्या.