SA vs IND 2nd Test : भारत अन् दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना जाणार पाण्यात? जाणून घ्या केपटाऊनचे हवामान

South Africa vs India Weather Forecast Cape Town News | भारतीय संघाच्या आशा मिळणार धुळीस
SA vs IND 2nd Test Weather Forecast Marathi News
SA vs IND 2nd Test Weather Forecast Marathi News

SA vs IND 2nd Test Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघ या मैदानावर आजपर्यंत येथे एकही सामना जिंकू शकलेला नाही.

त्याला सहापैकी चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. सध्याच्या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. जर तिने हा सामना जिंकला तर मालिका 1-1 अशी संपुष्टात येईल, पण भारतीय संघाच्या आशा धुळीस मिळू शकतात. केपटाऊनमधील सामन्यादरम्यान दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

SA vs IND 2nd Test Weather Forecast Marathi News
IND v SA: दुसऱ्या कसोटी सामन्याची बदलली वेळ! 1:30 वाजता नाही तर 'या' वेळेपासून पाहता येणार लाइव्ह ॲक्शन

दक्षिण आफ्रिकेत भारताला आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मालिका बरोबरीत संपवण्यात संघाला फक्त एकदा यश आले आहे. केपटाऊनमध्ये आतापर्यंत एकदा पण जिंकला नाही, त्यामुळे रोहित शर्माच्या संघासमोर कडवे आव्हान आहे, असे म्हणता येईल.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या कसोटीत टॉप ऑर्डरने सर्वांना नाराज केले होते. दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

SA vs IND 2nd Test Weather Forecast Marathi News
Venkatesh Prasad : 'तेथे मंदिर बांधणार...'; प्राण प्रतिष्ठापूर्वी माजी क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल

केपटाऊनमध्ये पहिल्या तीन दिवस पावसाचा अंदाज नाही. पण शेवटचे दोन दिवस खराब हवामानामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो. Accuweather नुसार, सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाची शक्यता नाही. त्यानंतर 6 जानेवारीला चौथ्या दिवशी 64 टक्के होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सामन्याच्या पाचव्या दिवशी (7 जानेवारी) पावसाची 55 टक्के शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com