विराटच्या विकेटमागचं 'राज' सोशल मीडियावर होतय व्हायरल

Virat Kohli Trolled
Virat Kohli Trolled

South Africa vs India, 1st Test : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Trolled) दुसऱ्या डावातही फेल ठरला. त्याने 32 चेंडूचा सामना करताना 4 चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. पहिल्या डावात 90 पेक्षा अधिक चेंडू खेळून त्याला 35 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. विशेष म्हणजे विराट पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला. मार्कोच्या गोलंदाजीवर विकेटमागे क्विंटन डिकॉकने त्याचा झेल टिपला.

कोहली सातत्याने एकाच प्रकारे प्रतिस्पर्ध्यांच्या जाळ्यात अडकत आहे. या चुकीमुळे त्याच्या भात्यातून बहरदार खेळी पाहण्यासाठी क्रिकेट चाहता मुकतोय. दुसऱ्या डावात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली पुन्हा एकदा वाईट खेळीमुळे ट्रेंडिंगमध्ये आलाय. त्याची ही खेळी पाहून अनेकांना धक्का बसलाय. तर काहीजण त्याच्या त्याच त्या चुकीवर भन्नाट मीम्स तयार करुन त्याला ट्रोल करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने राज चित्रपटातील डायलॉग रिक्रिएट करुन विराट कोहलीच्या विकेटची मजाक उडवली आहे.

विक्रम भट्ट दिग्दर्शित 'राज' चित्रपटात डिनो मोरिया, बिपाशा बासू आणि मालिनी शर्मा या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. एका नेटकऱ्याने या चित्रपटातील डिनो मोरिया आणि मालिनी यांच्यातील सीनचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत या चित्रपटातील फेमस डायलॉगला विराट कोहलीच्या विकेटशी कनेक्ट करण्याची क्रिएटिव्हिटी या युजर्सने दाखवून दिलीये. मालीनी शर्माचा डायलॉग हा आउट साइड ऑफ स्टम्प बॉल अन् डिनो मोरियाचा डायलॉग विराटशी जोडण्यात आलाय. "मै तुम्हे बरबाद कर दूंगी..." असा मालीनीचा डायलॉग आहे. त्यानंतर रिप्लाय देताना डिनो मोरियानं "मै बरबाद होना चाहता हू" असा एक सीन 'राज' चित्रपटात आहे. या दोन डायलॉगचा संगम हा विराट कोहलीच्या विकेटमध्ये जाणवतो, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसताहेत.

विराटपाठोपाठ पुजारानेही (Cheteshwar Pujara) मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यावरुनही नेटकऱ्यांना बॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्याची आठवण झाली आहे. पुजाराची विकेटही 'मैने प्यार किया' चित्रपटातील 'तू चल मै आयी...' सीनची आठवण करुन देणारी होती, असे काही नेटकऱ्यांना वाटते. अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 197 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 174 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जर दक्षिण आफ्रिकेला रोखण्यात भारतीय संघाला यश मिळाले तर मालिका विजयाच्या दृष्टीने भारताची ही मोठ्या दिशेनं वाटचाल ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com