SA vs IND: एनिग्डीचा 'लुंगी डान्स'; टीम इंडियाला नाचवलं!

Lungi Ngidi
Lungi Ngidi Sakal

IND vs SA: सेंच्युरियनच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका (Team India vs South Africa) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसानं बॅटिंग केली. त्याने खेळपट्टीचा रंग बदलल्याचे चित्र तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांसमोर भारतीय संघ अक्षरश: कोलमडून पडला. पहिल्या दिवशीच शतकाला गवसणी घातलेला लोकेश राहुल (123) (KL Rahul) अवघ्या एका धावेची भर घालून माघारी परतला. दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे (48) अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला.

सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर तिसऱ्या दिवशी एनिग्डीला रबाडाची साथ मिळाली. दोघांच्या भेदक माऱ्यासमार टीम इंडियाचा पहिला डाव 105.1 षटकात 327 धावांत आटोपला. 3 बाद 272 धावांवरुन भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. रबाडाने यष्टीरक्षक क्विंटन डिकॉककरवी राहुलच्या खेळीला ब्रेक लावला. अजिंक्य रहाणे 102 चेंडूत 48 धावा करुन तंबूत परतला. एनिग्डीने (Lungi Ngidi) त्याला बाद केले. ही जोडी बाद झाल्यानंतर भारतीय संघाची अवस्था 5 बाद 291 अशी होती. एनिग्डीनं पहिल्या दिवशी तीन विकेट घेतल्या होत्या. तिसऱ्या दिवशीही त्याने तेवढ्याच विकेट घेत भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या बाजूला कागिसो रबाडाने तीन विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. दमदार सुरुवातीनंतर भारतीय संघाने 55 धावांत 7 विकेट गमावल्या.

यापूर्वी श्रीलंकेच्या विरुद्ध मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघावर अशीच नामुष्की ओढावली होती. 278 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करुन अखेरच्या 7 विकेट्स टीम इंडियाने 41 धावांत गुंडाळल्या होत्या. 1997-98 मध्ये भारतीय संघाची अशी अवस्था झाली होती. 203-04 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने 311 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 55 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या.

एनिग्डीची सर्वोत्तम कामगिरी

एनिग्डीनं दुसऱ्यांदा टीम इंडियाविरुद्ध विकेट्सचा 'षटकार' खेचलाय. 2017-18 मध्ये त्याने भारतीय संघाविरुद्धच्या लढतीत 39 धावा खर्च करुन 6 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची कसोटीतील सर्वोच्च कामगिरी आहे. ही कामगिरी त्याने सेंच्युरियनच्या मैदानावरच केली होती. या दौऱ्यात त्याने 71 धावा खर्चून टीम इंडियाच्या 6 जणांना तंबूत धाडले. याच वर्षी वेस्ट इंडीज विरुद्ध त्याने 19 धावा खर्च करुन 5 बळी टीपले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com