
सेंच्युरियनवर पंतची 'सेंच्युरी'; जे धोनीला जमलं नाही ते करुन दाखवलं
Rishabh Pant Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांत आटोपून टीम इंडियाने 130 धावांची आघाडी घेतली आहे. सेंच्युरियनच्या मैदानातील कसोटी सामना भारतीय संघातील युवा यष्टीरक्षकासाठी खास असा राहिला. रिषभ पंतने पहिल्या डावात खास विक्रम आपल्या नावे करुन नवा इतिहास रचला. हा विक्रम करताना त्याने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. पंतने कसोटीत 100 जणांना तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. त्याने 26 व्या कसोटी सामन्यात हा विक्रम नोंदवला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंत 26 वा कसोटी सामना खेळत आहे. फलंदाजीत त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 13 चेंडूत 8 धावांची खेळी करुन तो माघारी परतला. त्यानंतर त्याने विकेटमागे आपली जबाबदारी लिलया पार पाडली. 26 सामन्यात त्याने यष्टीमागे 92 झेल टिपले असून 8 जणांना यष्टीचित केले आहे. या कामगिरीसह त्याने विकेटमागे सर्वात जलद 100 विकेट आपल्या नावे केल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड धोनीच्या नावे होता. धोनीपेक्षा 10 कसोटी सामने कमी खेळत त्याने ही कामगिरी करुन दाखवली. धोनीने विकेटमागे शंभर जणांना तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी 36 कसोटी सामने खेळले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने ट्विटच्या माध्यमातून रिषभ पंतला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.
Web Title: Sa Vs Ind Rishabh Pant Completed 100 Dismissals Test Broke Mahendra Singh Dhoni Record
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..