कोहलीला आठवला धोनीचा सल्ला; म्हणाला मला....

Virat Kohli And MS Dhoni
Virat Kohli And MS DhoniSakal

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट (Virat Kohli) कोहलीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) दिलेल्या सल्ल्याची आठवण करुन देत पुन्हा दमदार खेळी करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली होती. कोलकाताच्या मैदानातील या शतकानंतर त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येताना दिसते.

सोमवारी केपटाऊन कसोटीपूर्वी विराट कोहली म्हणाला की, “एमएस धोनीने एकदा मला सांगितले होते की, एकच चुक करताना 7-8 महिन्यांच अंतर असायला हवे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही खूप काळ खेळू शकता. माझ्या बाबतीत सध्यात तेच होत आहे. एकच चुक सारखी सारखी घडतीये याची त्याने कबुली दिली.

Virat Kohli And MS Dhoni
Covid Effect : SAI नं देशभरातील 67 ट्रेनिंग सेंटरचे शटर केलं डाऊन

कोहली मागील काही सामन्यांपासून बाहेर जाणाऱ्या चेंडूश छेडखानी करताना विकेट फेकतोय. यावरुन कोहलीवर टीकाही होते. यावरही त्याने भाष्य केले. तो म्हणाला की, “मी नेहमी देशासाठी खेळतो आणि याचा मला अभिमान आहे. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा होत नाहीत. वर्षभरापासून माझ्या बाबतीतही तेच होत आहे.

रिषभ पंतचेही केलं समर्थन

यावेळी कोहलीनं विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतची पाठराखण केली. तो म्हणाला की, आम्ही सुरुवातीला पंतसारख्या चुका वांरवार केल्या आहेत. पंत शॉट सिलेक्शनवरन चर्चेत आहे. चुकीचा फटका मारुन तो नाहक आपली विकेट गमावतो, हा विषय नेहमी चर्चेचा ठरतो. यावरच कोहलीने त्याची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com