Wimbledon 2025 : विम्बल्डन टेनिस, चार अव्वल खेळाडूंचे आव्हान संपुष्टात; अरीना आणि अल्काराझने सहज जिंकली फेरी
Wimbledon Tennis : अरीना सबलेंका आणि कार्लोस अल्काराझने विम्बल्डनमध्ये आपापल्या सामन्यांमध्ये अप्रतिम विजय मिळवले. पुरुष आणि महिला विभागातील इतर मानांकित खेळाडूंना सुरुवातीच्या फेऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला.
लंडन : अव्वल मानांकित अरीना सबलेंका हिने विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममधील आपली विजयी घोडदौड कायम राखली, मात्र अव्वल पाचमध्ये असलेल्या इतर चार खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.