Sachin Dhas : बीडच्या सचिनचा 'तो' शॉट अन् चर्चा गुरु लक्ष्मणची, नेटप्रॅक्टिसमध्ये दिले धडे आले कामी...

Sachin Dhas
Sachin Dhas sakal

बीडचा मराठमोळा युवक सचिन धसने प्रतिकूल परिस्थितीत झळकावलेल्या 96 धावा आणि कर्णधार उदय सहारनच्या 81 धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान दोन विकेट आणि सात चेंडू राखून परतवले आणि अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

सुपरसिक्समध्ये काही दिवसांपूर्वी नेपाळविरुद्धच्या सामन्यात शतक करणाऱ्या सचिनचे शतक आज चार धावांनी हुकले, परंतु त्याने 95 चेंडूत केलेली 96 धावांची खेळी शतकापेक्षाही मौल्यवान ठरली. 245 धावांच्या आव्हानासमोर भारताची 4 बाद 32 अशी अवस्था झाली होती.

Sachin Dhas
Sachin Dhas : सचिन... सचिन... वर्ल्ड सेमीफायनल मध्ये पुन्हा घुमला नारा, काय आहे बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

पराभवाचे काळे ढग जमा होऊ लागले होते, परंतु सचिनने कर्णधार उदय सहारनसह 171 धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यानंतर भारताची 7 बाद 227 अशी अवस्था झाली असताना सहारनने निर्णायक खेळी साकार केली. दोघांनी सुरुवातीला सावध खेळ करून जम बसवला आणि त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करून विजय दृष्टिपथात ठेवला.

Sachin Dhas
Uday Saharan : 'ही माझ्या वडिलांची स्टाईल' वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचताच कर्णधाराने सांगितलं बॅटिंगचं सिक्रेट

बीडच्या युवा सचिन धसच्या या खेळी दरम्यान सर्वात जास्त चर्चा पुल शॉट्सची झाली. त्याने 95 चेंडूत 96 धावांची खेळी केली होती. त्यात 11 चौकार आणि 1 षटकार मारला. सचिनच्या या खेळीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे पुल शॉट्स. या खेळपट्टीवर त्याने एकामागून एक अनेक पुल शॉट्स खेळले.

सचिन धस व्हीव्हीएस लक्ष्मण आणि शुभमन गिलच्या शैलीत पुल शॉट्स मारताना दिसला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्ही. व्ही. एस.लक्ष्मण हे अंडर-19 टीम सोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यामुळे त्याने सचिन धसला नेटप्रॅक्टिसमध्ये दिले धडे नक्कीच कामी आले असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com