क्रिकेटच्या देवाची सुंदर भेट!

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

सचिनने या भेटीचे दोन फोटो त्याच्या ट्विटर अकांउटवरून पोस्ट केले असून त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे भारत विरुद्ध बांग्लादेश हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी काल (मंगळवार) एकत्र आले होते.

भारत विरुद्ध बांग्लादेशचा सामना पाहण्यासाठी सुंदर पिचाई हे बर्मिंगहॅम येथे आले होते. तेव्हा त्यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. सचिनने या भेटीचे दोन फोटो त्याच्या ट्विटर अकांउटवरून पोस्ट केले असून त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. यावेळी सचिनने पिचाई यांच्या नावाची फोड करत या पोस्टला कॅप्शन दिले. हे फोटो पोस्ट करताना सचिनने लिहिले आहे की, 'क्या ए सुंदर पिक-है?

या मजेशीर पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध दोन भारतीय क्रिकेटच्या सामन्यासाठी एकत्र आले. गुगलचे सीईओ आणि गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती एकत्र आल्याचे ट्विट एका चाहत्याने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar and Google CEO Sundar Pichai meets together yesterday