INDvsSA :  बुमराची उणीव, तरी पर्याय भरपूर : सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar believes that team india can perform best even without jasprit bumrah
Sachin Tendulkar believes that team india can perform best even without jasprit bumrah

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रित बुमराची उणीव भासेल, पण तरी ती जाणवू न देण्या इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असी प्रतिक्रिया भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली. 

पाठीच्या दुखण्यामुळे बुमरा या मालिकेत खेळू शकणार नाही. तो नसल्याने भारतीय गोलंदाजीची ताकद काहिशी कमी होईल, पण त्याची उणिव भासू देणार नाहीत इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असे सांगून सचिन म्हणाला,"कर्णधार कोहलीला बुमराची उणिव निश्‍चित भासेल यात शंका नाही. पण, तो दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याची उणिव भासू देणार नाहीत, असे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाज आपल्याकडे आहेतच, जोडीला फिरकी गोलंदाजही त्यांची भूमिका बजावत आहेत.'' 

कसोटी क्रिकेट हे दर्जेदारच आहे. आता कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या निमित्ताने ते अधिक लोकप्रिय होईल आणि मालिकाही चुरशीने खेळल्या जातील. 
-सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू

बुमराच्या गैरहजेरीची काळजी नको, त्याची जागा दुसरे गोलंदाज नक्की घेतील त्यांच्यावर विश्‍वास ठेवा असे सांगून सचिन म्हणाला,"अलिकडे भारताने वेगवान गोलंदाजांची एक चांगली फळी उभी केली आहे. एक गेला, तर दुसरा तयार असतो. आपली दुसरी फळी देखील तेवढी सक्षम आहे इतके आपण नशिबवान आहोत. कसोटीसाठी निवडण्यात आलेले गोलंदाज नक्कीच दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान उभे करतील.'' 

मायदेशात अलिकडच्या काळात भारत कमालीचा यशस्वी राहिला आहे. या वेळी देखील राहिल असे सांगून सचिन म्हणाला,"दक्षिण आफ्रिका संघात असे खूप थोडे खेळाडू आहेत की जे यापूर्वी येथे कसोटी क्रिकेट खेळले आहेत. त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यांना खेळाच्या नियोजना बदल करावा लागणार आहे. त्यांच्यापुढे सकारात्मक दृष्टिकोन नठेवून खेळण्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे गोलंदाज नक्कीच चांगले आहेत. त्यामुळे फलंदाजी करताना फलंदाजांनी भागीदारी वाढविण्यावर भर द्यावा.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com