esakal | सचिनने शेअर केलेल्या फोटोतील त्या तिघी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

NursesDay

सचिनने शेअर केलेल्या फोटोतील त्या तिघी कोण?

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

विक्रमादित्य आणि क्रिकेटच्या मैदानात देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय नर्स डे (International Nurses Day 2021) च्या निमित्ताने ट्विटरचा डीपी बदलल्याचे पाहायला मिळाले. ट्विटर प्रोफाईलच्या डीपीवर नर्सचा फोटो लावत त्याने जगभरातील नर्संना मानाचा मुजराच केलाय. याशिवाय सचिनने आसाममधील 3 नर्सचा फोटोही ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत थकवा न बाळगता फ्रंट लाईन वर्कर काम करत आहेत. देशवासियांसाठी सेवा देण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे सचिनने म्हटले आहे.

फ्रंट लाईन वर्करच्या रुपात आहोरात्र मेहनत घेत असलेल्या नर्ससंदर्भात सचिनने पुढे लिहिलंय की, कठीण परिस्थितीत मानवतेची सेवा करणे, आमची अस्वस्थता दूर करण्यासाठी रात्रभर जागणे, आमची काळजी घेणं. तुम्ही जे काही करत आहात त्याच्याबद्दल खूप खूप आभार. #HappyInternationalNursesDay

हेही वाचा: EPL : मँचेस्टर सिटी 10 वर्षांत पाचव्यांदा 'चॅम्पियन'

कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्जार्ज झाल्यानंतरही सचिन तेंडुलकरने डॉक्टर आणि स्टाफ मेंबर्सचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले होते. सचिनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन ज्या 3 नर्सचा फोटो शेअर केल्याय त्याबद्दलही त्याने सविस्तर माहिती दिलीय. लालनुन्हलिमी (Lalnunhlimi), लालरोजामी (Lalrozami) आणि ऐबांसी रानी (Aibansi Rani) अशी या तिघींची नावे आहेत. आसामच्या मकुंडा रुग्णालयातील हा फोटो आहे. याठिकाणी नर्सेस आसाम, मिझोराम आणि त्रिपुराच्या सीमेजवळील दुर्गम भागाता कार्यरत असल्याचा उल्लेख सचिने केलाय.