Sara Tendulkar |सारा तेंडुलकरची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sara tendulkar
Sara Tendulkar |सारा तेंडुलकरची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या वडिलांप्रमाणेच सारा तेंडुलकरही (Sachin Tendulkar) माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असते. तिच्या लुक्स आणि चित्रपट सृष्टीतील व्यक्तींबरोबरचा वावर पाहून ती अभिनयाकडे (Acting) वळणार का अशा चर्चा सुरु असतात. आता सारा तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जाहिरात जगतात आपले पदार्पण करत ग्लॅमरस दुनियेत पाऊल टाकले आहे. (Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Debut in Advertising)

सारा तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कपड्यांच्या ब्रँडसाठीची केलेली जाहिरात (Advertising) सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सारा तेंडुलकर वेगवेगळ्या अंदाजात आणि पोजमध्ये दिसत आहे. २४ वर्षाच्या सारा तेंडुलकर बरोबरच या जाहिरातीत बनिता संधू (Banita Sandhu) आणि तानिया श्रॉफ (Tania Shroff) देखील आहेत.

सारा तेंडुलकरने आपली काही छायचित्रे इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. सारा तेंडुलकरचा हा नवा अंदाच चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सारा या जाहिरातीत एका तळ्याच्या काठी उभी असल्याचे दिसते. तेथे सारा वेगवेगळ्या पोज देते. व्हिडिओच्या सुरुवातीला सारा तेंडुलकर एकटीच दिसते. मात्र त्यानंतर अभिनेत्री बनिता संधू (Banita Sandhu) आणि तानिया श्रॉफ (Tania Shroff) दिसतात.

साराने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या केल्या त्याच्यावर कमेंटचा पाऊस पडला. काहींनी सारा तेंडुलकर हॉलीवूडच्या अभिनेत्रीसारखी दिसत आहे. तर काहींनी असे वाटते की तुम्ही ग्रीच्या रहिवासी आहात.

सारा ही सचिन आणि अंजली तेंडुलकरची (Anjali Tendulkar) यांची मोठी मुलगी आहे. साराचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा सध्या आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाकडून खेळतो. साराने आपले शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यानंतर मेडिसीनमधील आपली पदवी लंडनमध्ये (London) पूर्ण केली. साराच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा सर्वांकडून कौतुक होत आहे.

Web Title: Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Debut In Advertising

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top