सचिन झाला किवी गोलंदाजाच्या फलंदाजीवरही 'फिदा'

कायले जेमिन्सन एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत विशेष छाप सोडेल.
sachin on Jamieson
sachin on Jamieson E sakal

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (ICC WTC Final) क्रिकेट जगतातील अव्वल फलंदाजांना रोखाणाऱ्या कायले जेमिन्सनसंदर्भात मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मोठं वक्तव्य केलय. टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांसमोर दमदार कामगिरी करुन दाखवणारा कायले जेमिन्सन (Kyle Jamieson) आगामी काळात स्टार अष्टपैलूच्या रुपात दिसेल, अशी भविष्यवाणी सचिन तेंडुलकरने केलीये. जेमिन्सन याने वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये 44 धावा खर्च करुन 7 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना 21 धावांची खेळी केली होती. (Sachin Tendulkar On Kyle Jamieson This Player Will Become A Star All Rounder)

कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या काही सामन्यांचा अनुभव गाठीशी असताना त्याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर संघाला पहिली वहिली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीचे मास्टर ब्लास्टरने कौतुक केले आहे.

sachin on Jamieson
WTC : 10 चेंडूत गमावला सामना; सचिनने घेतलं कोहली-पुजाराचं नाव

आपल्या YouTube चॅनेलवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून सचिनने जेमिन्सनवर कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की, कायले जेमिन्सन एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत विशेष छाप सोडेल. यापूर्वी त्याला न्यूझीलंडमध्ये खेळताना पाहिले होते. चेंडू स्विंग करण्यावर अधिक भर देण्यापेक्षा आपल्या उंचीचा योग्य वापर करत सीमचा मारा करुन समोरच्या फलंदाजाला अडचणीत आणतो. त्यामुळेच तो टिम साउदी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅगनर यांच्यापेक्षा वेगळा आहे, असेही सचिनने म्हटले आहे.

sachin on Jamieson
WTC Final मधील 5 मोठे विक्रम; अश्विनसह चौघांची हवा

जेमिन्सनच्या गोलंदाजीतील बारकावे सांगताना सचिन म्हणाला की, तो जोर लावून चेंडू पीचवर टाकतो. मनगटाचा कोन करुन त्याने उजव्या हाताच्या फलंदाजांना कमालीचे इनस्विंग टाकले. गोलंदाजीत विविधताही पाहायला मिळाली. आपल्या उंचीचा योग्य वापर त्याने फलंदाजीवेळी मोठा फटका खेळताना दाखवून दिला. हा अंदाज प्रभावित करणारा होता, असेही सचिनने सांगितले. विल्यमसनसोबत त्याने केलेली भागीदारी संघासाठी उपयुक्त ठरली. त्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक बॅटिंग केली. उंच फलंदाज ज्यावेळी फ्रंटफूटवर खेळतो ते कमालीचे असते. त्याने आपल्या फलंदाजीने भारतीय गोलंदाजांच्या टप्पा बिघडवला. गोलंदाजांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकायला त्याने भाग पाडले, असे सचिनने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com