Team India Selector : चेतन शर्मा 'अभी जिंदा है'! पुन्हा होणार निवड समितीचे अध्यक्ष ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Selector Chetan Sharma

Team India Selector : चेतन शर्मा 'अभी जिंदा है'! पुन्हा होणार निवड समितीचे अध्यक्ष ?

Team India Selector : ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला. या निकालानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कारवाई करत निवड समिती बरखास्त केली. बोर्डाने नवीन निवड समितीच्या स्थापनेसाठी इच्छुक माजी क्रिकेटपटूंकडूनही अर्ज मागवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या समितीसाठी अनेक अर्ज आले असून, त्यात मागील समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: Team India: रोहित-विराटला टी-20 मध्ये नारळ?, हार्दिकच पुन्हा कर्णधार

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मागील समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि त्यांच्यासोबत समितीत असलेला आणखी हरविंदर सिंग यांनी या पदासाठी पुन्हा आपला दावा मांडला आहे. तथापि, चेतन शर्माच्या आधी काही काळ चेअरमन असलेले माजी फिरकीपटू सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांनी पुन्हा नावे टाकलेली नाहीत. मोहंती यांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर होता. आतापर्यंत चेतन शर्मा आणि हरविंदर यांच्यासह 60 हून अधिक अर्ज बीसीसीआयकडे आले आहेत.

हेही वाचा: KL Rahul-Athiya Shetty : 'या' दिवशी बोहल्यावर चढणार राहुल; BCCI नेच केला खुलासा

आत्तापर्यंत कोणत्या शर्यतीत?

  • अजित आगरकर (26 कसोटी, 191 वनडे)

  • नयन मोंगिया (44 कसोटी, 140 एकदिवसीय)

  • लक्ष्मण शिवरामकृष्णन (9 कसोटी, 16 वनडे

निवड समितीची निवड बीसीसीआय पाच वर्षांसाठी करणार आहे. ज्या पाच सदस्यांची निवड केली जाईल, त्यात जो अनुभवाच्या दृष्टीने वरिष्ठ खेळाडू असेल तो आपोआप मुख्य निवडकर्ता होईल. अशा स्थितीत मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत कोण सामील आहे, हे आता दिसून येत आहे.

हेही वाचा: IND vs BAN Schedule : टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर...! संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर

मुख्य निवडकर्ता होण्यासाठी काय आहे आवश्यक

  • 7 किंवा अधिक कसोटी सामने खेळलेला कोणताही खेळाडू.

  • 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे.

  • 10 एकदिवसीय सामने किंवा 20 लिस्ट-ए सामने खेळलेले असावेत.

  • 5 वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती.

  • बीसीसीआयच्या कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील 5 वर्षे सेवा करू शकेल.