पाक गोलंदाजाला सचिन म्हणाला; 'भाई इतना सिरियस होकर मत खेलो...'

पाक गोलंदाजाला सचिन म्हणाला; 'भाई इतना सिरियस होकर मत खेलो...'

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने (Saeed Ajmal) एका मुलाखतीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबत 2014 मध्ये घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला. एमसीसी आणि शेष विश्व यांच्यात झालेल्या चॅरिटी सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये भारताकडू सचिन तेंडूलकर तर पाकिस्तानकडून सईद अजमल यांनी सहभाग नोंदवला होता. शेष विश्व संघात अॅडम गिलख्रिस्ट, विरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन, युवराज सिंह, शाहिद अफरीदी आणि शेन वॉर्न यासारखे दिग्गज होते. तर एमसीसीमध्ये ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सईद अजमल यासारके अनुभवी खेळाडू होतो. (When Sachin Tendulkar told Ajmal to 'have fun' in charity match)

शेष विश्व संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमसीसीकडून खेळणाऱ्या सईद अजमलनं आपल्या पहिल्या चार षटकात चार विकेट घेत शेष विश्व संघाचं कंबरडं मोडलं होतं. अजमलच्या भेदक गोलंदाजीपुढे शेष विश्व संघानं 12 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा करता आल्या. यावेळी सचिन तेंडुलकर आणि सईद अजमलमध्ये बातचीत झाली. यावेळी नेमकं काय झालं होतं... याबाबतचा खुलसा सईद अजमल यानं क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत उलघडला आहे.

पाक गोलंदाजाला सचिन म्हणाला; 'भाई इतना सिरियस होकर मत खेलो...'
प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा - सचिन तेंडुलकर

सईद म्हणाला की, 'सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर माझ्याकडे आला. हा चॅरिटी सामना आह. सामन्याचा आनंद घे. इतकं सिरियस खेळायची गरज नाही. सामना जितका वेळ चालेल तितका जास्त फंड जमा होईल.' सचिनने सांगितल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हा एक मैत्रीपूर्ण सामना होता. पण पहिल्या तासाभरातच मी चार विकेट घेतल्या होत्या. सामना जितका जास्तवेळ चालणार तितका फंड जमा होणार होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com