
नवी दिल्ली : सरकारकडून विविध आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेतात त्या टेनिस खेळाडूंनी देशाकडून खेळण्यास प्राधान्य द्यायलाच हवे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय देशाचे प्रतिनिधित्व करताना माघार घेतली तर त्यांना देण्यात आलेले सर्व अर्थसहाय्य काढून घेतले जाईल, असी सक्त आदेश क्रीडा प्राधिकरणाने (साई) दिला आहे.