MOA Secretary Namdev Shirgaonkar Booked in Financial Misconduct Case
esakal
FIR against Maharashtra Olympic Association Secretary Namdev Shirgaonkar: अहिल्यानगर- महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अखेर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक मासाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने वारंवार हिशेब सादर करण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी ती मुदत संपल्यानंतरही हिशेब सादर केलेला नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप उत्तमराव भोंडवे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.