Sakal Premier League: पास, वेग अन् गोलचा थरार! ‘सकाळ प्रीमियर लीग फुटसल’ स्पर्धेला दिमाखात सुरुवात; २६ संघांमध्ये रंगणार चुरस

Sakal Premier League Futsal:पुण्यातील एरंडवणे येथील लोटस स्पोर्ट्स एरिनामध्ये ‘सकाळ प्रीमियर लीग फुटसल’ स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. २६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, रविवारपर्यंत फुटबॉलप्रेमींना वेगवान आणि चुरशीच्या सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे.
Sakal Premier League

Sakal Premier League

esakal

Updated on

पुणे : प्रत्येक पासमधील अचूकता, प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरण्यासाठी लागलेला कस आणि पापणी लवते न लवते तोच गोलपोस्टची जाळी हलविणारा गोल... अशा वेगवान खेळाच्या थरारात ‘सकाळ प्रीमियर लीग फुटसल’ स्पर्धेला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फुटबॉलचा थरार आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या चुरशीच्या सामन्यांनी एरंडवणे येथील ‘लोटस स्पोर्ट्स एरिना’ दणाणून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com