Sakshi Malik News : काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? साक्षी मलिकने दिलं उत्तर

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संडय सिंह यांनी डब्लूएफआय अध्यक्ष बनल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने खेळातूल संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
sakshi malik on contesting elections on congress ticket after she quits wrwstling bajrang punia
sakshi malik on contesting elections on congress ticket after she quits wrwstling bajrang punia

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संडय सिंह यांनी डब्लूएफआय अध्यक्ष बनल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने खेळातूल संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. तसचे ऑलंम्पिक पदक विजेत पहलवान बजरंग पुनिया याने देखील शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला. साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांने शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यादरम्यान साक्षीला काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर साक्षीने उत्तर दिलं.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत साक्षी मलिक म्हणाली की, कुस्तीपटूंची लढत ब्रिजभूषण विरुद्ध होती. फेडरेशनने त्यांचया ताबा काढून घेतला जावाअशी आमची इच्छा होती. महिलेला महासंघाच्या अध्यक्षपदी बसवण्याबाबतही आम्ही सरकारशी चर्चा केली होती. जेणेकरून महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी सरकारनेही आमची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण निकाल सर्वांसमोर आहे, ब्रिजभूषण यांचे उजवे हात आणि व्यावसायिक भागीदार महासंघाचे अध्यक्ष झाले.

साक्षी हरयाणातून निवडणूक लढवणार? या प्रश्नाला उत्तर देताना साक्षी म्हणाली की, असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. मी कुस्ती सोडली आहे. मला सध्या दु:खी आहे. यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल. भविष्यात काय करावे लागेल हे सांगता येत नाही, मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

sakshi malik on contesting elections on congress ticket after she quits wrwstling bajrang punia
Sakshi Malik : निराश साक्षी मलिकचा कुस्तीला रामराम; कुस्ती संघटनेच्या निवडणूक निकालानंतर टोकाचा निर्णय

साक्षी आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. जेव्हा साक्षीला विचारण्यात आले की हे आंदोलन कुस्तीपटू विरुद्ध ब्रिजभूषण वरून भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये बदललं आहे. यावर साक्षी म्हणाली, आज आम्ही दु:खी आहोत, आम्हाला कोणी पाठिंबा देण्यासाठी आला तर आम्हाला काहीच हरकत नाही. भाजपचा कोणीही नेता आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आला तर त्याचेही स्वागत करू.

sakshi malik on contesting elections on congress ticket after she quits wrwstling bajrang punia
Bajrang Punia : मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत पाठवतोय... बजरंग पुनियानं उचललं टोकाचं पाऊल

प्रियांका गांधींकडून पाठिंब्याचे आश्वासन

दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रियांका म्हणाल्या की, ज्या महिला कुस्तीपटूंनी जगभरात देशाचे नाव मोठं केलं आहे त्यांनी भाजप खासदारावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, पण सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.भारतीय जनता पक्ष आजही आरोपींच्या पाठीशी उभा असून देशातील महिला हे अत्याचार पाहत आहेत. कुस्तीपटू प्रियंका गांधींना भेटायला गेले तेव्हा काँग्रेस नेते दीपेंद्र हुडाही त्यांच्यासोबत होते. तत्पूर्वी, दीपेंद्र हुड्डा यांनी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, जिथे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा देखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com