
नवी दिल्ली : अनुभवी खेळाडू सलिमा टेटे हिच्या भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चीनमधील हँगझू येथे ५ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड करण्यात आली आहे. भारताचा २० खेळाडूंचा संघ सज्ज झाला आहे.