Sandeep Lamichhane : नेपाळचा स्टार क्रिकेटर संदीप लामिछानेला झाली आठ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा

Sandeep Lamichhane
Sandeep Lamichhaneesakal

Sandeep Lamichhane 8 years in prison : नेपाळचा स्टार गोलंदाज संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणी 8 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. नेपाळ कोर्टाने 17 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. गेल्या महिन्यात लामिछानेला अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

आता न्यायालयाने या प्रकरणी संदीपला 8 वर्षाचा तुरूंगवास आणि पीडितेला नुकसान भरपाई, दंड देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय शिशीर राज धाकल यांच्या बेंचने दिला आहे.

Sandeep Lamichhane
Shreyas Iyer : अय्यरला विश्रांती नाही तर मिळाली शिक्षा; काय म्हणाला राहुल द्रविड?

नेपाळचा 23 वर्षाचा फिरकीपटू संदीप लामिछाने हा नेपाळचा एक चांगला क्रिकेटपटू होता. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिट्सकडून खेळला. मात्र आता त्याला बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यामुळे आठ वर्षे तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. याचबरोबर त्याला 3 लाख रूपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याला पीडितेला 2 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे.

Sandeep Lamichhane
Virat Kohli : राहुल द्रविडने विराट कोहलीबाबत दिली मोठी अपडेट; वैयक्तिक कारणामुळं...

17 वर्षाच्या मुलीने लामिछानेविरूद्ध 6 सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी कलम 219 अंतर्गत तपास केला. त्यानंतर लामिछानेला 6 ऑक्टोबर 2022 ला अटक करण्यात आली. तो त्रिनिदादवरून कॅरेबियन लीग खेळून मायदेशात परतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच अटक करण्यात आली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com