esakal | 'तू फिरकीपटू आहेस, धाडसी असायला हवं'; सांगलीच्या तरणजीतला धोनीचा गुरुमंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

'तू फिरकीपटू आहेस, धाडसी असायला हवं'; सांगलीच्या तरणजीतला धोनीचा गुरुमंत्र

'तू फिरकीपटू आहेस, धाडसी असायला हवं'; सांगलीच्या तरणजीतला धोनीचा गुरुमंत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सांगली : ‘तू फिरकी गोलंदाज आहेस, तू धाडसी असलं पाहिजेस. जसं क्षेत्ररक्षण (filding) लावलं आहेस, त्याप्रमाणे गोलंदाजी (balling) करत राहा. त्यात एक-दोन फटके बसले तरी घाबरून जायचे नाही, स्वतःवर आणि स्वतःच्या व्यूहरचनेवर शंभर टक्के विश्‍वास ठेवायचा, असा गुरुमंत्र सांगलीकर (sangli) क्रिकेटपटू तरणजीत धिल्लाँ याला भारतीय क्रिकेट संघाचा (Indian critcket team) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (mahendrasing dhoni) याने दिला.

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट (IPL) स्पर्धेत माही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व (chennai super kings) करतो आणि या संघाला फलंदाजीचा सराव देण्यासाठी तरणजीतची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र संघाकडून (maharashtra) सातत्याने विजय हजारे चषक, मुश्‍ताक अली चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने तरणजीतची निवड झाली होती. त्याने एक महिना चेन्नईत चेपॉक स्टेडियमवर आणि त्यानंतर सामनानिहाय मुंबई आणि दिल्लीत गोलंदाजी केली. दोन दिवसांपूर्वी तो सांगलीत परतला.

तो म्हणाला, ‘‘ही मोठी संधी होती. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. गोलंदाजी पद्धतीत मला बदल करण्याचा सल्ला मिळाला. पुढचा पाय पंजावर लॅंड होत नव्हता. तो बदल केला. प्रशिक्षक सिमन्स (दक्षिण आफ्रिका) (south afrika) यांनी मला बारकावे सांगितले. भविष्यात त्याचा फायदा होईल. इम्रान ताहीर, मोईन अली यांनी मला आत्मविश्‍वास दिला. फाफ डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड यांनी विश्‍वास दाखवला. खूप टिप्स दिल्या.’’

तो म्हणाला, ‘‘माहीभाईबद्दल काय आणि किती बोलावे. त्याची विचारसरणी, प्लॅन प्रोसेस अतिशय सोपी आहे. तो गोलंदाजांना त्यांच्या मनाप्रमाणे गोलंदाजी करायला सांगतो. त्यातून यश येत नसेल, तर मग आपला प्लॅन राबवतो. माझा माईंड सेट त्याने तयार केला. माहीभाईला गोलंदाजी करताना आधी भीती वाटत होती. त्याने खूप षटकार हाणले, मीही त्याला बाद केले. त्यांच्याशी गप्पा मारून मजा आली. खूप वेगळा माणूस आहे. सर्वांशी एकसमान दर्जाने वागतो. त्याने मला सांगितले, तू जसे ठरवले आहेस, तसेच खेळले पाहिजेस. स्वतःवर विश्‍वास ठेवून गोलंदाजी केली पाहिजे.’’

तरणजीत म्हणाला, ‘‘माझ्या या प्रवासात जिल्हा क्रिकेट संघटनेचे संजय बजाज, माझे प्रशिक्षक चेतन पडियार, फिटनेस गुरु योगिता पडियार, माझी आई यांच्यासह अनेक अदृश्‍य हात आहेत. मी दोन वर्षे रणजी ट्रॉफीतून बाहेर होतो. त्यांनी मला या संकटातून बाहेर पडायला मदत केली.’’

यंदा संधीतून अपेक्षा

तरणजीत म्हणाला, ‘‘मी सध्या आयपीएलसाठी उपलब्ध खेळाडूंच्या यादीत आहे. यंदा माझी गोलंदाजी सर्वांनी पाहिली आहे. पुढील हंगामात मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.’’