
सांगली : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत येथील स्टार वेटलिफ्टर यश खंडागळे याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. अहमदाबाद येथील नारणपुरा येथे नव्याने बांधलेल्या वीर सावरकर क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहेत. ६५ किलो गटात त्याने दोन विक्रमांची नोंद करत त्याने सुवर्णपदक मिळवले. कनिष्ठ गटात सांगलीच्या खेळाडूला सुवर्णपदक मिळाल्याने दिग्विजय व्यायाम संस्थेत आनंदोत्सव साजरा झाला.