esakal | मिश्र दुहेरीत रंगणार सानिया-बोपण्णा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

मिश्र दुहेरीत रंगणार सानिया-बोपण्णा सामना

मिश्र दुहेरीत रंगणार सानिया-बोपण्णा सामना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेलबर्न - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेली सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांची जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्धी बनली आहे. या दोघांत उपांत्यपूर्व सामना होईल. सानियाने क्रोएशियाच्या जोडीदार इव्हान डॉडिग याच्या साथीत साईसाई झेंग (चीन)-अलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) यांना 2-6, 6-3, 10-6 असे हरविले. पेयाने 5-5 अशा स्थितीत "डबल फॉल्ट' केली. बोपण्णालाही कॅनडाची जोडीदार गॅब्रिएला डॅब्रोस्की हिच्या साथीत सुपर टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले. त्यांना पाचव्या मानांकित युंग-जॅन चॅन (तैवान)-ल्युकास क्‍युबोट (पोलंड) यांच्यावर 6-4, 5-7, 10-3 अशी मात केली. प्रतिस्पर्धी जोडीला पाचवे मानांकन होते.

गॅब्रिएला-बोपण्णाला मानांकन नाही, तर सानिया-इव्हानला दुसरे मानांकन आहे. भारताच्या खेळाडूंमधील ज्याची जोडी जिंकेल त्यांना उपांत्य फेरीत पेस-हिंगीस यांच्याशी खेळावे लागू शकेल. त्यासाठी पेस-हिंगीसने आगेकूच करणे आवश्‍यक आहे.