सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत स्विमिंग पूलमध्ये हॉट फोटोशूट | Sania mirza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर (Ayesha Omar) आणि शोएब मलिकच्या (Shoaib Malik) हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे. आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री (Pakistani actress) आहे. पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि ओमरने फोटोशूट केलं आहे. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरु आहे.

शोएब मलिक भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आहे. गुरुवारी दुबईत झालेल्या टी २० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या सामन्याला सानिया मिर्झा हजर होती. पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देताना ती दिसली. आयेशा आणि शोएबने मागच्या महिन्यात हे फोटोशूट केलं आहे. पण रविवारी पाकिस्तानी संघाने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले.

हेही वाचा: दिल्लीमध्ये हेल्थ इमर्जन्सीची परिस्थिती; प्रदुषित हवा बनली 'जीवघेणी'

त्यांचे हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर युझ्रर्सनी अनेक प्रश्न विचारले आहेत. एका युझरच्या प्रश्नाला उत्तर देताना ओमरने आमच्यात कुठलेही अफेअर सुरु नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तुम्ही दोघं लग्न करणार का? असा प्रश्न एका युझरने विचारला. त्यावर आयेशा ओमरने अजिबात नाही असे उत्तर दिले.

हेही वाचा: बॉम्ब फोडणार म्हणतात, साधी लवंगी फुटत नाही - संजय राऊत

"शोएबच लग्न झालय आणि तो त्याच्या पत्नीसोबत आनंदी आहे. मी शोएब आणि सानिया दोघांचा आदर करते" असे आयेशा म्हणाली. शोएब आणि मी एकमेकाचे हितचिंतक आहोत. शोएब आणि मी परस्परांचे चांगले मित्र आहोत. या जगात लोकांचे असे संबंध असतात, असे तिने सांगितले.

loading image
go to top