esakal | सानिया, पेस व बोपण्णाचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza

सानिया, पेस व बोपण्णाचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरी व मिश्र दुहेरीत सहभागी झालेले भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा, लिअँडर पेस व रोहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णाने डेन्मार्कचा जोडीदार फ्रेडीक निल्सनच्या साथीने रॉडेक स्टेपनाक व नानेद झिमॉनिक या जोडीवर 6-3, 6-7 (3), 6-3 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळविला. तर महिला दुहेरीत सानिया मिर्झाने आपली नवी साथीदार चेक प्रजासत्ताकची बार्बोरा स्ट्रेकोवा हिच्यासाथीने अमेरिकेच्या जाडा हार्ट व एना शिबाहारा यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला.

भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेसने मार्टिना हिंगीसच्या साथीने पहिल्या फेरीत विजय मिळविला. या दोघांनी अमेरिकेच्या साचिया विकेरी व फ्रान्सेस तिओफी यांचा 6-3, 6-2 असा पराभव केला. सानिया मिर्झाने या स्पर्धेपूर्वी दोन विजेतेपद मिळविली असल्याने तिच्याकडून या ग्रँडस्लॅमचे विजेतेपद मिळविण्याची टेनिसप्रेमींना आशा आहे.

loading image