शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया म्हणते, मला तुझा अभिमान

वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019

शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने भावनिक टि्वट करत म्हटले आहे, की प्रत्येक कथेला शेवट असतो, पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली 20 वर्ष अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे.

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर सानिया मिर्झाने भावनिक ट्विट करत तु जे काही आतापर्यंत मिळविले आहेस याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर शोएबने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय शोएबने गेली 20 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले. 2007 ते 2009 दरम्यान तो पाकिस्तानचा कर्णधारही होता. 1999 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शोएबने वनडेमध्ये तर 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2019 च्या विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शोएबने 2015 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2018 मध्ये शंभर ट्वेंटी-ट्वेंटीचे सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला होता. त्याने निवृत्तीनंतर ट्विट करताना म्हटले होते, की मी आज एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत  आहे. मला आतापर्यंत पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.

शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने भावनिक टि्वट करत म्हटले आहे, की प्रत्येक कथेला शेवट असतो, पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली 20 वर्ष अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirza tweet after Shoaib Malik Pakistan stars ODI retirement