भारत-पाक सामन्यामुळं सानिया मिर्झा घाबरली, घेतला 'हा' निर्णय

Sania Mirza
Sania Mirzaesakal
Summary

या व्हिडिओवर भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंहनं हसणारे इमोन्जी पोस्ट करत एक कमेंट केलीय.

आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) एकाच गटात असून 24 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमने सामने येतील. क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान सामन्याची नेहमीच उत्सुकता असते. आता टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दुबईच्या मैदानात (Dubai International Cricket Stadium) पुन्हा या दोन संघात तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेट जगताच्या नजरा या लढतीवर खिळल्या आहेत. सोशल मीडियावरही या हायहोल्टेज सामन्याची जोरदार चर्चा सुरुय.

पण, भारतात अशी एक व्यक्ती आहे, जी या सामन्यामुळं सोशल मीडिया सोडू इच्छित आहे. तिचं नाव टेनिसपटू सानिया मिर्झा. ती पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकची पत्नी आहे. सानियानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत आपण आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याची माहिती चाहत्यांना दिलीय. सानियानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टेक्सटच्या माध्यमातून हा संदेश देण्यात आलाय. 'मी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याच्या दिवशी सोशल मीडिया आणि टॉक्सिसिटीपासून दूर राहण्याच्या हेतूनं गायबच असेल, असं तिनं म्हटलंय. हा व्हिडिओ पोस्ट करताना सानियानं कॅप्शनमध्ये, ‘बाय-बाय’ असं देखील लिहिलंय.

Sania Mirza
पंतप्रधानांनी बुद्धांची मूर्ती ट्विट करताच, भारतीयांनी दिला 'हा' सल्ला

या व्हिडिओवर भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंहनं हसणारे इमोन्जी पोस्ट करत एक कमेंट केलीय. 'चांगला विचार आहे (Good Idea), असं युवराजनं म्हटलंय. नेटिझन्स अनेकदा सानियाला सोशल मीडियावर ट्रोल करत असतात, त्यामुळे तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून हा निर्णय घेतलाय. टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दुबईच्या मैदानात (Dubai International Cricket Stadium) पुन्हा या दोन संघात तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा क्रिकेटर सामना हरतात अथवा जिंकतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना लोक ट्रोल करत असतात. यावेळी शोएब मलिकचीही पाकिस्तान संघात निवड झालीय. त्यामुळं लोक आतापासूनच सानियाला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. हा व्हिडिओ खूप मजेदार पद्धतीनं बनवला असून सानियानं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर देखील शेअर केलाय. आतापर्यंत हा व्हिडिओ 50 हजारांहून अधिक लोकांनी पसंत केलाय.

Sania Mirza
उत्तर कोरियानं समुद्रात पुन्हा डागली क्षेपणास्त्रं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com