Sania Mirza : ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांतून...सानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza

Sania Mirza : ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांतून...सानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (saniya mirza Shoaib Malik Divorce Pakistan social media )

काही दिवसांपूर्वी शोएब मलिकने आपल्या लेकाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, सानिया मिर्झाने एकही फोटो शेअर केला नाही. नुकताच सानियाने सोशल मीडियावर आपल्या लेकासोबत एक फोटो शेअर केला आहे.

मात्र, तिच्या या पोस्टमधील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जातात…' अस सानियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण आल आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

इतकेच नव्हे तर सानियाच्या इंस्टा पोस्टचीदेखील चर्चा रंगली आहे. तुटलेले दिल नेमके जातात कुठे? असा सवाल सानियाने स्टोरीमधून उपस्थित केला होता. सानिया मिर्झाच्या या पोस्टवरून अनेक चर्चांना उधाण आलंय.

सानियानं १२ एप्रिल २०१०रोजी पाकिस्तानचा माजी कप्तान शोएब मलिकसोबत विवाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. गूगल ट्रेंड्सनुसार २०१०मध्ये सानियाला सर्वात जास्त विवाह प्रस्ताव आले होते. शिवाय इंटरनेटवर सगळ्याच जास्त सर्च झालेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झा होती. सानिया-शोएबच्या लग्नात बऱ्याच अडचणीही आल्या.

टॅग्स :sania mirza