esakal | संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास 
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju Samson failed in Yo Yo test

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत "अ' संघातील संजू सॅमसन आणि भारताच्या संघातील महंमद शमी अपयशी ठरल्यामुळे त्यांना संबंधित संघांतून वगळण्यात आले आहे. 

संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत "अ' संघातील संजू सॅमसन आणि भारताच्या संघातील महंमद शमी अपयशी ठरल्यामुळे त्यांना संबंधित संघांतून वगळण्यात आले आहे. 

संजू सॅमसनला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत "अ' संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत "अ' संघ कालच लंडनला रवाना झाला. भारतीय संघात निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला यो यो चाचणी आवश्‍यक आहे. या चाचणीत सॅमसनला 16.1 गुण मिळाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्यात संपलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून खेळताना सॅमसनने चांगली कामगिरी केली होती. त्याला काही हलक्‍या दुखापती झालेल्या असल्यामुळे यो-यो चाचणीत उत्तीर्ण होऊ शकला नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

वेगवान गोलंदाज महंमद शमीदेखील चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले आहे. या चाचणीमध्ये हार्दिक पंड्या आणि करुण नायर हे दोन खेळाडू सर्वाधिक गुणांनी पास झाल्याचे "बीसीसीआय' अधिकाऱ्यांनी सांगितले. 

loading image
go to top