WI vs IND : टी 20 मालिकेसाठी केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनची वर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju Samson Replaced KL Rahul For 5 T20I Match Series Against West Indies

WI vs IND : टी 20 मालिकेसाठी केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनची वर्णी

नवी दिल्ली : भारतीय निवडसमितीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या (West Indies Vs India T20I Series) मालिकेसाठी दुखापतग्रस्त केएल राहुलच्या (KL Rahul) जागी विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) याची निवड केली आहे. संघाची घोषणा झाली त्यावेळी संघात केएल राहुलचा देखील समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच्या नावसमोर स्टार होता. कारण जर तो दौऱ्याच्या सुरूवातीपर्यंत फिट झाला तरच त्याचा संघात समावेश करण्यात येणार होता.

मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत असतानाच गेल्या आठवड्यात केएल राहुलला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. केएल राहुलच्या जागी येणारा संजू सॅमसन विंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत खेळला होता. ही मालिका भारताने 3 - 0 अशी जिंकली होती.

भारताचा 5 टी 20 सामन्यासाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटले, अर्शदीप सिंग